महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 11, 2020, 3:45 PM IST

ETV Bharat / sports

एटीके मोहन बागानची नवी जर्सी तुम्ही पाहिली का?

''संस्कृती आणि परंपरा कायम ठेवली गेली आहे. लोगोमध्येही ही ओळख कायम ठेवली गेली आहे'', असे एटीके मोहन बागान सांगितले. तीन वेळा आयएसएल चॅम्पियन एटीके आणि आय-लीगचा विजेता मोहन बागान यावर्षी जानेवारीत एकत्र आले होते. एटीकेचे मालक संजीव गोयंका यांनी मोहन बागानची 80 टक्के भागीदारी विकत घेतली आहे.

atk mohun bagan will retain the iconic green and maroon jersey
एटीके मोहन बागानची नवी जर्सी तुम्ही पाहिली का?

कोलकाता - एटीके मोहन बागानच्या बोर्डाने हिरव्या आणि लाल रंगाच्या जर्सीचा वारसा जतन करणार असल्याचे सांगितले आहे. शुक्रवारी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत क्लबचे नाव एटीके मोहन बागान असे बदलण्यात आले. तर लोगोमध्ये मोहन बागानची ओळख असलेल्या 'बोट'वर 'एटीके' हा शब्द लिहिण्यात आला.

''संस्कृती आणि परंपरा कायम ठेवली गेली आहे. लोगोमध्येही ही ओळख कायम ठेवली गेली आहे'', असे एटीके मोहन बागान सांगितले. तीन वेळा आयएसएल चॅम्पियन एटीके आणि आय-लीगचा विजेता मोहन बागान यावर्षी जानेवारीत एकत्र आले होते. एटीकेचे मालक संजीव गोयंका यांनी मोहन बागानची 80 टक्के भागीदारी विकत घेतली आहे.

संजीव गोयंका म्हणाले, "मोहन बागान लहानपणापासूनच माझ्याजवळ आहे. हिरव्या आणि लाल जर्सीमध्ये त्यांच्या सर्वोत्तम फुटबॉल खेळाचा आनंद मला मिळाला आहे. आम्ही याच वारसा जपला आहे. एटीके मोहन बागान हा जागतिक स्तरीय संघ म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवू शकेल.''

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष आणि एटीकेचा सह-मालक आणि बोर्डाचा संचालक सौरव गांगुलीही या ऑनलाइन बैठकीस उपस्थित होता. गांगुली म्हणाला, ''एटीके आणि मोहन बागान एकत्र येण्याबद्दल मी त्यांना सलाम करतो. एटीके मोहन बागान इतिहास घडवेल."

ABOUT THE AUTHOR

...view details