रोम -इटलीची फुटबॉल लीग सेरी-एच्या गतविजेत्या जुव्हेंटसला एसी मिलानकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. सामन्याच्या 60व्या मिनिटापर्यंत 2-0 ने आघाडीवर असलेल्या जुव्हेंटसवर मिलानने शेवटच्या सत्रात कुरघोडी केली आणि झ्लाटन इब्राहिमोविचच्या संघाने रोनाल्डोच्या संघाचा 4-2 असा पराभव केला.
मंगळवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात जुव्हेंटसने पहिल्या सत्रात वर्चस्व राखले, परंतु दोन्ही संघांना गोल करता आले नाही. दुसर्या सत्रात जुव्हेंटससाठी 47व्या मिनिटाला एड्रियेन राबियोटने पहिला गोल नोंदवला. त्यानंतर 53 व्या मिनिटाला स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आणखी एक गोल करून जुव्हेंटला आघाडी मिळवून दिली.