मुंबई:महान फलंदाज सचिन तेंडुलकरने ( Great Batsman Sachin Tendulkar ) पाकिस्तानविरुद्धच्या मुलतान कसोटीत द्विशतक झळकावल्यानंतर डाव घोषित करता आला असता, असे मत भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला वाटत आहे. 29 मार्च 2004 रोजी, विरेंद्र सेहवाग कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 309 धावा करून कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावणारा पहिला भारतीय ठरला. पण भारताचा तत्कालीन कर्णधार आणि सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने ( Head Coach Rahul Dravid ) पहिला डाव 161.5 षटकात 675/5 वर घोषित करण्याचा निर्णय घेतला होता.
या घोषणेमुळे सचिन नाबाद 194 धावा करुन तंबूत परतला ( Sachin returned unbeaten on 194 runs ), जो त्याच्या द्विशतकापासून सहा धावांनी दूर होता. सचिन तेंडुलकरने आपल्या 'प्लेइंग इट माय वे' या आत्मचरित्रातही याबद्दल लिहिले आहे. "मध्यभागी आम्हाला संदेश मिळाला की, आम्हाला वेगवान खेळायचे आहे आणि आम्ही डाव घोषित करणार आहोत," तो म्हणाला, आम्ही दुसर्या षटकात सहा धावा करू शकलो असतो. मला वाटत नाही की आणखी दोन षटके खेळल्याने कसोटी सामन्यात काही फरक पडला असता.
युवराज म्हणाला, जर तिसरा किंवा चौथा दिवस असता, तर तुम्हाला संघाला प्रथम प्राधान्य द्यावे लागते आणि तो 150 धावांवर असतानाही ते डाव घोषित करू शकले असते. पण त्यांनी वेगळ्या प्रकारे निर्णय घेतला होता. मला वाटतं सचिनच्या 200 नंतर डाव घोषित करता आला असता. त्या सामन्यात 59 धावांवर बाद होणारा शेवटचा खेळाडू असलेल्या युवराजने लाहोरमधील पुढच्या कसोटीत शतक झळकावले. पण त्याच्या कसोटी कारकिर्दीने त्याच्या पांढऱ्या चेंडूच्या प्रवासातील गौरवशाली उंची कधीही गाठली नाही, त्याने 40 कसोटींमध्ये 33.92 च्या सरासरीने 1900 धावा केल्या.