महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Ravikant Shukla Fraud : बिल्डरची क्रिकेटरला जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल - याजदान बिल्डरविरोधात फसवणुकीचा गुन्हा

क्रिकेटर रविकांत शुक्ला याने याजदान बिल्डरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शुक्ला याने याजदान बिल्डरकडे त्याचे ७१ लाख रुपये परत मागितले असता, बिल्डरने त्याला कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दिली.

Ravikant Shukla
रविकांत शुक्ला

By

Published : Feb 3, 2023, 12:37 PM IST

नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटपटू रविकांत शुक्ला फसवणुकीचा बळी ठरला आहे. रविकांतने याजदान बिल्डरवर फसवणुकीचा आरोप केला आहे. याजदान बिल्डरने सुमारे ७१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे त्यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. रविकांत शुक्ला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू रवींद्र जडेजासोबत संघात खेळला आहे. त्याला आयपीएल 2009 च्या हंगामात पंजाब किंग्जने विकत घेतले होते. त्याने विश्वचषक स्पर्धेत अंडर 19 संघाचे नेतृत्व देखील केले आहे.

71 लाख रुपयांची फसवणूक : रविकांत शुक्ला याने रायबरेलीच्या हजरतगंज पोलिस ठाण्यात याजदान बिल्डरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तो म्हणाला की, याजदान बिल्डरने एलडीएच्या नियमानुसार अपार्टमेंट बनवले होते. नंतर हे अपार्टमेंट बेकायदा जमिनीवर बांधल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे एलडीएने डिसेंबरमध्ये हे अपार्टमेंट बेकायदेशीर ठरवून पाडले होते. यानंतर त्याने याजदान बिल्डरकडे त्याचे ७१ लाख रुपये परत मागितले असता, बिल्डरने त्याला कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत त्याने याजदान बिल्डरच्या प्राग नारायण रोड अलया हेरिटेज अपार्टमेंटमध्ये दोन फ्लॅट बुक केल्याचे म्हटले आहे.

पोलिसांचा तपास सुरु : ३५ वर्षीय रविकांत हा मूळचा उत्तर प्रदेशातील रायबरेलीचा आहे. हजरतगंजचे प्रभारी निरीक्षक अखिलेश मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविकांत सध्या लखनऊमधील हजरतगंजमधील दालीबाग भागातील बटलर रोडवरील केके अपार्टमेंटमध्ये राहतो. त्याने हजरतगंज पोलिस ठाण्यात याजदान बिल्डरविरोधात तक्रार दिली आहे. 7 जणांनी आपली फसवणूक करून 71 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्याने केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

माजी फुटबॉलपटू परिमल डे यांचे निधन : माजी भारतीय फुटबॉलपटू 'परिमल डे' यांचे बुधवारी वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने 'परिमल डे' यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या जाण्याने कोलकाता फुटबाॅल क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. परिमल डे यांना 2019 मध्ये पश्चिम बंगाल सरकारने 'बंग भूषण' ही पदवी प्रदान केली होती. त्यांचा जन्म 4 मे 1941 रोजी झाला. 1960 च्या दशकात परिमल डे यांनी भारतीय फुटबॉल संघासाठी चमकदार कामगिरी केली होती. क्वालालंपूर येथे 1966 च्या मर्डेका कप मॅचमध्ये रिपब्लिक ऑफ कोरिया विरुद्ध परिमल डे यांनी गोल करून भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते. परिमल डे यांनी 1962, 1969 मध्ये देशांतर्गत सामन्यांमध्ये त्यांच्या संघासाठी दोनदा संतोष ट्रॉफी जिंकली आहे.

हेही वाचा :Khelo India Youth Games : खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा, पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले!

ABOUT THE AUTHOR

...view details