महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 21, 2021, 3:04 PM IST

ETV Bharat / sports

WTC Final : चौथ्या दिवसांचा खेळ होणार की नाही, दिनेश कार्तिकने दिले अपडेट

दिनेशने साउथम्पटन येथील मैदानाचा फोटो शेअर करत 'सॉरी' म्हटलं आहे. पुढे त्याने ही वेळ चांगली वाटत नसल्याचे देखील सांगितलं आहे. दरम्यान, कार्तिकचे ट्विट पाहता चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

wtc-final dinesh karthik gives weather-update from stadium ahead of day 4 says sorry cricket fans
WTC Final : चौथ्या दिवसांचा खेळ होणार की नाही, दिनेश कार्तिकने दिले अपडेट

साउथम्पटन -जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत समालोचकाची भूमिका निभावत असलेल्या दिनेश कार्तिकने साउथम्पटन येथील हवामानाविषयी अपडेट दिले आहेत. कार्तिकने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन मैदानाच्या फोटो शेअर केला आहे. या फोटोत पाऊस होत असल्याचे पाहायला मिळत आहे. हीच स्थिती कायम राहिली तर चौथ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात येऊ शकतो.

दिनेशने साउथम्पटन येथील मैदानाचा फोटो शेअर करत 'सॉरी' म्हटलं आहे. पुढे त्याने ही वेळ चांगली वाटत नसल्याचे देखील सांगितलं आहे. दरम्यान, कार्तिकचे ट्विट पाहता चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

भारतीय संघ २१७ धावांत गारद -

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना साउथम्पटनमध्ये रंगला आहे. न्यूझीलंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर भारताचा पहिला डाव २१७ धावांवर आटोपला आहे. तिसऱ्या दिवशी भारताच्या एकाही फलंदाजाला न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा धैर्याने सामना करता आला नाही. काइल जेमिसनने ५ गडी बाद करत भारताच्या डावाला खिंडार पाडले.

न्यूझीलंडचा दमदार सुरूवात -

भारताच्या २१७ धावांच्या प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडने दमदार सुरूवात केली आहे. तिसऱ्या दिवसाअखेर न्यूझीलंडने २ बाद १०१ धावा केल्या. कॉनवे (५४) आणि लॅथम (३०) हे दोघे बाद झाले आहेत. तर कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलर हे नाबाद आहेत.

हेही वाचा -WTC FINAL : न्यूझीलंडची सामन्यावर मजबूत पकड, भारत पिछाडीवर

हेही वाचा -WTC Final : भर मैदानात विराट कोहलीचा भांगडा, पाहा भन्नाट व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details