गुवाहाटी :ICC एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी काउंटडाउन सुरू झालं आहे. यात सहभागी होणारे सर्व संघ जोरदार तयारीला लागले आहेत. ICC एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक यावेळी कोण जिंकणार याकडं सर्व क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलंय. गुवाहाटीत संघ यायला सुरुवात झाली आहे. आधीच काही क्रिकेट संघ सराव सामन्यांसाठी पोहोचले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गुरुवारी सराव सामन्यासाठी आज दाखल झाला असून तेथे गतविजेत्या इंग्लंडचा सामना 30 सप्टेंबर रोजी होणार आहे. यापूर्वी श्रीलंका, बांगलादेशाचा संघ बुधवारी शहरात दाखल झाले होते.
ऑस्ट्रेलियाचा 2-1नं पराभव : 12 वर्षांनंतर मायदेशी प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकण्याचा भारतीय संघ जोरदार तयारी करीत आहे. यासाठी भारतीय संघ अंतिम चाचणी घेत आहे. एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या संघानं नुकत्याच संपलेल्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचं बोर्झार येथील एलजीबीआय विमानतळावर आगमन झाल्यानंतर आसाम क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आणि आसाम सरकारच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. त्यानंतर संघ रॅडिसन ब्लूला गेला.