महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

World Cup 2023 IND vs NZ : जखमी हार्दिक पंड्याची जागा कोण घेणार, राहुल द्रविडनं स्पष्टचं सांगितलं - WORLD CUP 2023

World Cup 2023 IND vs NZ : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितले की, धर्मशाला येथे न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या पुढील सामन्यात खेळण्यासाठी संघ व्यवस्थापन वेगवेगळ्या संयोजनांवर विचार करत आहे. वाचा मीनाक्षी राव यांचा खास रिपोर्ट

World Cup 2023 IND vs NZ
World Cup 2023 IND vs NZ

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2023, 10:56 PM IST

धर्मशालाWorld Cup 2023 IND vs NZ :न्यूझीलंडविरुद्धच्या भारताच्या महत्त्वाच्या सामन्यासाठी दुखापतग्रस्त हार्दिक पंड्या प्लेइंग 11 मधून बाहेर पडाव लागलय. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सागितलं की, संघ व्यवस्थापन सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी यांच्या नावाचा विचार करत आहे. शनिवारी सामनापूर्व पत्रकार परिषदेत राहुल द्रविड म्हणाले की, 'इशान किशन संघात असणं चांगलं आहे. सध्या तो चांगला खेळत आहे. त्यानंतर, सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही जबरदस्त फॉर्ममध्ये होता.तो फिरकीच्या विरोधात चमकदार कामगिरी करणारा खेळाडू आहे. डाव्या हाताची फिरकी असो किंवा डावखुरा फिरकी असो, तो कोणत्याही प्रकारची फिरकी चांगली खेळतो.

शार्दुल फलंदाजीची संधी मिळाली नाही : शार्दुल ठाकूरला आतापर्यंत फलंदाजीची संधी मिळालेली नाही. गेल्या दोन सामन्यांत त्यानं वेगवान धावा केल्या आहेत. त्याची भूमिका अष्टपैलू गोलंदाजाची होती. शार्दुलबद्दल बोलताना द्रविड म्हणाले, 'त्याच्याकडं विकेट घेण्याचं चांगलं कौशल्य आहे. काही विकेट्साठी आमच्याकडं चौथा वेगवान गोलंदाज पर्याय आहे. शेवटच्या क्षणी त्याला फारशी फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. पण तो नेटमध्ये त्याच्या फलंदाजीवर खूप मेहनत घेत आहे. त्याच्याकडं मोठे फटके मारण्याची क्षमता असल्याचं आपण पाहिलं आहे. अर्थात, त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये जास्त फलंदाजी केली आहे. कारण त्याला फारशी फलंदाजी करण्याची संधी मिळालेली नाही.

संयोजनावर लक्ष केंद्रित :हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीमुळं आता संयोजनावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. 'शमीसारख्या खेळाडूला सामन्यात आणणं हा उत्तम पर्याय आहे. काही प्रकरणांमध्ये, रविचंद्रन अश्विनकडे खूप चांगली क्षमता आहे. त्यामुळं हा विचार करता हार्दिक (पांड्या) परत येईपर्यंत आम्ही दोन किंवा तीन कॉम्बिनेशन वापरू शकतो. 'हार्दिक पांड्या हा संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. ज्यानं संघाला संतुलित ठेवण्यास मदत केली आहे. आमच्याकडं कदाचित पहिल्या चार सामन्यांमध्ये जसा समतोल होता, तसा नाही. या परिस्थिती कोणतं नियोजन चांगलं काम करेल हे पाहावे लागेल.

फिरकीपटूंच्या आउटपुटचं कौतुक :फिरकीपटूंच्या आउटपुटचं कौतुक करताना राहुल द्रविडनं पहिल्या सामन्यातील तिघांच्या तर पुढच्या तीन सामन्यात कुलदीप यादव, रवींद्र जडेजा यांच्या गोलंदाजीचं कौतुक केलंय. आमचे गोलंदाज सामन्यावर नियंत्रण ठेवण्यास, विकेट घेण्यास, धावगती कमी करण्यास सक्षम आहेत. दोघेही डावखुरे फिरकीपटू असले तरीही दोन्ही फिरकीपटू वेगवेगळी कौशल्ये आहेत.

हेही वाचा -

  1. India vs New Zealand : भारत-न्यूझीलंड विश्वचषक सामन्यांत कोण करणार जादू? जाणून घ्या दोन्ही संघाचा आढावा
  2. World Cup 2023 IND vs NZ : भारत, न्यूझीलंडमध्ये होणार काटे की टक्कर; काय आहे भारतीय संघाची रणनीती? वाचा सविस्तर
  3. ICC World CUP 2023 : विश्वचषकात भारतीय संघाची अप्रतिम कामगिरी, विरोधकाला पराभूत करण्याची न्यूझीलंड संघात ताकद

ABOUT THE AUTHOR

...view details