ऑकलंड :आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील आठरावा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( India vs Australia ) संघात होणार आहे. हा सामना शनिवारी ऑकलंड येथील ईडन पार्क येथे खेळला जाणारा आहे. या सामन्याच्या अगोदर ऑस्ट्रेलियाची खेळाडू ताहलिया मॅकग्राथने भारताबाबत मोठे विधान केले आहे. मॅकग्राथ गुरुवारी म्हणाली, आम्ही या स्पर्धेत भारताला पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. सध्या ऑस्ट्रेलिया चार सामन्यांतून चार विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे, भारताने या स्पर्धेत दोन सामने जिंकले आहेत आणि दोन सामने गमावले आहेत.
ताहलिया मॅकग्राथ ( Tahalia McGrath on Indian Team ) म्हणाली, नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या मालिकेत आम्हाला खूप यश मिळाले होते. पण, हे एक नवीन ठिकाणं आहे आणि नवीन स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेत काहीही होऊ शकते. त्याचबरोबर तो जागतिक दर्जाचा संघ आहे. आम्ही त्यांच्यावर आमचा होमवर्क करु. उद्या खुप सराव करु आणि शनिवारी त्यांना हरवण्याची प्रत्येक प्रत्येक मार्गाचा अवलंब करु. भारतला बुधवारी इंग्लंडकडून चार गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध जोरदार पुनरागमन करण्याचा विचार करेल याची मॅक्ग्राथला जाणीव आहे.