महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Women's World Cup: आस्ट्रेलियाचा पाच विकेट्सने बांगलादेशवर विजय - बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया

आस्ट्रेलियाने साखळी सामन्यातील आपल्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशवर पाच विकेट्सने विजय मिळवला ( Australia Women won by 5 wkts ). त्य़ाचबरोबर साखळी सामन्यात अपराजित राहण्याचा कारनामा देखील केला. ऑस्ट्रेलियाचा हा सलग सातवा विजय आहे ( Australia seventh win ), ज्यामुळे त्यांना गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवून उपांत्य फेरी गाठण्यात मदत झाली आहे.

Australia
Australia

By

Published : Mar 25, 2022, 5:13 PM IST

वेलिंग्टन:आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2022 ( Women's World Cup ) या स्पर्धेतील 25 वा सामना शुक्रवारी पार पडला. हा सामना बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( Bangladesh v Australia ) संघात वेलिंग्टन येथे खेळला गेला. पावसामुळे हा सामना 43 षटकांचा खेळवण्यात आला. तसेच या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशवर पाच विकेट्सने मात केली. प्रथम खेळताना बांगलादेशने 135/6 (43) धावा केल्या होत्या. त्यानंतर 136 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 32.1 षटकांत 5 गडी गमावून हे लक्ष्य पूर्ण केले.

या सामन्यात बेथ मुनीच्या नाबाद 66 ( Beth Mooney not out 66 runs ) आणि अॅनाबेल सदरलँड (नाबाद 26) सोबतच्या नाबाद 65 धावांच्या भागीदारीमुळे हा विजय 32.1 षटकांत 136 धावा करताना मिळवता आला. मुनी आणि सदरलँडच्या प्रयत्नांनंतर, फिरकीपटू सलमा खातूनने ( From spinner Salma Khatun ) 23 धावांत तीन बळी घेतले. ज्यामध्ये तिने अ‍ॅलिसा हिली, रेचेल हेन्स आणि कर्णधार मेग लॅनिंग यांना लवकर बाद करून तिने ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला होता. ताहलिया मॅकग्रा आणि ऍशले गार्डनर देखील बाद झाले, तेव्हा ऑस्ट्रेलियाची स्थिती आणखी बिघडली होती. परंतु त्यानंतर कारण मूनीने चमकदार फलंदाजी केली आणि सदरलँडच्या सोबतीने विजय मिळवला. बांगलादेशविरुद्ध विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने मेगा स्पर्धेच्या लीग टप्प्यात अपराजित राहण्याचा कारनामा केला आहे.

तत्पूर्वी, पावसाच्या व्यत्ययामुळे सामना उशिरा सुरू झाल्यानंतर, मुर्शिदा खातून (12) आणि शर्मीन अख्तर (24) यांनी आक्रमक खेळ केला. या जोडीने पहिल्या विकेट्साठी 33 धावांंची भागीदारी केली. त्यानंतर रुमाना अहमद आणि सलमा खातून यांनी प्रत्येकी 15 धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर बांगलादेशसाठी लता मंडलने ( Batsman Lata Mandal ) सर्वाधिक 33 धावा केल्या. तसेच अंतिमता बांगलादेशने 43 षटकांत 6 बाद 135 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून गार्डनर आणि डावखुरा फिरकीपटू जेस जोनासेन यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.

संक्षिप्त धावफलक:

ऑस्ट्रेलिया 32.1 षटकांत 136/5 (बेथ मुनी नाबाद 66, अॅनाबेल सदरलँड नाबाद 26, सलमा खातून 3/23, नाहिदा अख्तर 1/33)

बांगलादेश 43 षटकांत 135/6 (लता मोंडल 33, शर्मीन अख्तर 24, जेस जोनासेन) 2/13 आणि ऍशले गार्डनर 2/20).

ABOUT THE AUTHOR

...view details