पुणे:आयपीएल 2022 चे साखळी सामने रविवारी संपल्यानंतर सोमवार (23 मे) पासून महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोव्हा ( Trailblazers vs Supernovas ) यांच्यात होणार आहे. हा सामना संध्याकाळी साडेसातला पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडियमवर सुरु होईल. स्मृती मंधानाच्या ( Smriti Mandhana ) खांद्यावर ट्रेलब्लेझर्सची तर सुपरनोव्हा संघाची कमान हरमनप्रीत कौरच्या ( Harmanpreet Kaur ) खांद्यावर असणार आहे.
2020 मध्ये, सुपरनोव्हास अंतिम सामन्यात ट्रेलब्लेझर्सकडून पराभूत झाले. त्याचा बदला आज घेण्याचा हेतू सुपरनोव्हाचा असेल. कोरोना व्हायरसमुळे गेल्या वर्षी ही स्पर्धा झाली नव्हती. यावर्षी पुन्हा त्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लीगमधील तिसरा संघ वेलोसिटी आहे. ट्रेलब्लेझर्समध्ये मंधाना व्यतिरिक्त जेमिमा रॉड्रिग्स आणि रिचा घोष सारख्या खेळाडू आहेत जे फलंदाजी मजबूत करतील. त्याचबरोबर गोलंदाजीत पूनम यादव राजेश्वरी गायकवाड या नावांचा समावेश आहे. संघ संतुलित दिसत आहे.
दुसरीकडे, सुपरनोव्हाच्या फलंदाजीची जबाबदारी कर्णधार हरमनप्रीत कौरवर ( Captain Harmanpreet Kaur ) असेल. तिच्याशिवाय तानिया भाटिया आणि प्रिया पुनिया याही फलंदाजीसाठी ओळखल्या जातात. गोलंदाजीत या संघात मानसी जोशी आणि मेघना सिंग अशी नावे आहेत. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चुरशीची सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल. त्याचबरोबर हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि हॉटस्टारवर थेट पाहता येईल.