ड्युनेडिन : सध्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाचा ( ICC Women's ODI World Cup ) थरार सुरु आहे. या स्पर्धेतील पाचवा सामना न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यात पार पाडला. या सामन्यात न्यूझीलंडने बांग्लादेशवर 9 विकेट्सने विजय मिलवला आहे. 34 वर्षीय बेट्सने नाबाद 79 धावा केल्या आणि न्यूझीलंडने प्रतिस्पर्ध्यांचे 140 धावांचे लक्ष्य सात षटके बाकी असताना पार केले.
4 मार्चला स्टैफनी टेलरच्या नेतृत्वाखाली खेळताना वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या सामन्यात न्यूझीलंडला पराभव पत्कारावा लागला होता. त्यानंतर न्यूझीलंडचा हा स्पर्धेतील पहिलाच विजय आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना 34 वर्षीय न्यूझीलंड संघाच्या 34 वर्षीय बेट्सने पावसामुळे 27 षटकांपर्यंत कमी झालेल्या सामन्यात आपला सर्व अनुभव वापरला, ज्यात तिने आठ चौकारांसह नाबाद 79 धावा केल्या. त्याचबरोबर न्यूझीलंडने त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या 140/8 धावसंख्येला मागे सोडले.
या विजयासह भारत आणि दक्षिण आफ्रिकेनंतर संघ तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर बांगलादेश त्यांच्या दोन सामन्यांत विजयापासून वंचित असून सातव्या स्थानावर आहे. तत्पूर्वी, फलंदाजीला आलेल्या बांगलादेशच्या हॉक आणि शमिमा सुलताना (33) यांनी स्पर्धेत दुसऱ्यांदा बिनबाद 50 धावांपर्यंत मजल मारत बांगलादेशला चांगली सुरुवात करून दिली. पण फ्रान्सिस मॅकेने ( Bowler Francis McKay ) बांगलादेशला पहिला धक्का दिला.