नवी दिल्ली -भारतीय क्रिकेट संघात वनडे आणि टी -20 च्या कर्णधारपदाबाबत नवीन बदल होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने यावर विचार सुरू केला असून विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहित शर्माला ही जबाबदारी मिळू शकते.
रोहित शर्माला जबाबदारी मिळण्याची शक्यता -
कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने निवृत्ती स्विकारल्यानंतर विराट कोहलीकडे तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाची देण्यात आली आहे. त्याचबरोबर कर्णधार कोहलीनेही संघाला प्रत्येक फॉरमॅटमध्ये विजय मिळवून दिला आहे. पण आता ही जबाबदारी 34 वर्षीय रोहित शर्माला देण्याची चर्चा आहे. हे बदल वर्ल्ड टी 20 विश्वचषकानंतर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाच्या दबावामुळे विराट कोहलीच्या फलंदाजीवर परिणाम होत आहे, अशी चर्चा आहे.
Ind vs Eng : पाचवा कसोटी सामना रद्द झाल्याने टीम इंडियावर भडकला जेम्स अँडरसन, म्हणाला...