अँटिगा - महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान, दोन खेळाडू बेशुद्ध होऊन मैदानात पडले. दोन्ही महिला खेळाडू १० मिनिटात एकानंतर एक बेशुद्ध झाल्या. दोघींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. माध्यमानी दिलेल्या वृत्तानुसार, आता त्या दोन्ही खेळाडूंची प्रकृती ठीक आहे. दरम्यान ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पाकिस्तान महिला क्रिकेट संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. उभय संघात या दौऱ्यातील दुसरा टी-२० सामना अँटिगा येथे रंगला होता. या सामन्यातील पाकिस्तानच्या फलंदाजी दरम्यान, वेस्ट इंडिजची वेगवान गोलंदाज चिनेले हेनरी अचानक बेशुद्ध झाली. तिला तात्काळ मैदानाबाहेर घेऊन जाण्यात आले. त्यानंतर थोड्याच वेळात फलंदाज चेडियन नेशन देखील बेशुद्ध झाली. यामुळे त्या दोघांनी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, दोन्ही महिला खेळाडू कोणत्या कारणाने अचानक बेशुद्ध झाल्या, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
वेस्ट इंडिज क्रिकेटचे मुख्य प्रशिक्षक कर्टनी वॉल्श यांनी सांगितलं की, आम्ही या घटनेची संपूर्ण माहितीची वाट पाहत आहोत. ही घटना कशी आणि का झाली याची संपूर्ण माहिती आल्यानंतरच यावर भाष्य करता येईल.
वेस्ट इंडिजचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे विजय -