हैदराबाद: भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग ( Batsman Virender Sehwag ) आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त बरीच वर्ष झाली आहे. परतु तो अध्याप ही क्रिकेटच्या दुनियेत अॅक्टिव्ह आहे. तो आपल्या ट्विटर हँडलवरील ट्विटवरुन नेहमीच खुप चर्चेत असतो. ट्विटरवरील त्यांची टिप्पणी केवळ व्यंग्यात्मकच नाही, तर अतिशय मजेदार आणि मनोरंजकही आहे. सेहवाग कोणत्याही मुद्द्यावर उपहासात्मक ट्विट करायला मागेपुढे पाहत नाही.
आज 29 मार्च 2022 आहे आणि या तारखेबाबत वीरेंद्र सेहवागने एक अतिशय मनोरंजक ट्विट केले आहे. सेहवागने सांगितले की, ही तारीख त्याच्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे. या तारखेला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत आणि आयुष्यात किती मोठ्या गोष्टी घडल्या आहेत. 29 मार्च या तारखेला वीरेंद्र सेहवागच्या जीवनात खुप महत्वपूर्ण स्थान आहे.
वीरेंद्र सेहवाग एक ट्विटमध्ये म्हणाला, "तारखेत काय ठेवले आहे? 29 मार्च हा माझ्या क्रिकेट कारकिर्दीसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी मी पाकिस्तानविरुद्ध मुलतानमध्ये पहिले त्रिशतक झळकावले. त्याच तारखेला मी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 319 धावा करून बाद झालो. मजेशीर गोष्ट म्हणजे माझ्याकडे एक कार आहे, ज्याचा नंबर 2903 आहे. जरी मी याबद्दल कोणतेही नियोजन केले नव्हते, तरी देखील हा नंबर मला योगायोगाने मिळाला.''