नागपूर :आगामी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी विराट कोहली आणि के एल राहुल नागपुरात पोहोचले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA) स्टेडियमवर होणार आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशन ( व्हीसीए ) स्टेडियम पाच वर्षांनंतर कसोटी सामन्याचे आयोजन करणार आहे. त्याचवेळी, कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी, ऑस्ट्रेलिया संघ बेंगळुरूच्या बाहेरील भागात चार दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करणार आहे.
के एल राहुल उपकर्णधार पदाची जबाबदारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत केएल राहुल उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. 23 जानेवारी रोजी के एल राहुलने सुनिल शेट्टीची मुलगी तसेच अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत सात फेरे घेत लग्न केले आहे. लग्नाला आता 11 दिवस झाले आहेत. के एल राहुल मैदानात परतला आहे. कसोटी मालिकेमुळे के एल राहुलला हनीमूनलाही जाता आले नाही. लग्नाचे रिसेप्शन देखील अजून झालेले नाही. राहुलने २०१४ मध्ये मेलबर्नमध्ये टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण केले होते. त्याला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कसोटीत पदार्पणाची कॅप दिली होती.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका :पहिली कसोटी नागपूरमध्ये 9 ते 13 फेब्रुवारी, दुसरी कसोटी दिल्लीत १७ ते २१ फेब्रुवारी, तिसरी कसोटी धर्मशाला 1 ते 5 मार्च, चौथी कसोटी अहमदाबाद 9 ते 13 मार्च येथे होत आहे. भारतीय संघा मधे बॉर्डर गावस्कर मालिकेसाठी अष्टपैलू रवींद्र जडेजाही फिटनेसमध्ये आहे. तो अनेक महिने संघाबाहेर होता. अष्टपैलू जडेजाला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (NCA) पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याची परवानगी दिली आहे. जडेजाने शेवटचा सामना ऑगस्ट २०२२ मध्ये हाँगकाँगविरुद्ध खेळला होता. सामन्यादरम्यान, त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे तो ५ महिने क्रिकेटपासून दूर होता.
भारतीय संघ : भारतीय संघात रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव. यांचासमावेश आहे. ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स (क), अॅ श्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅ लेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क , मिचेल स्वीपसन, डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलिया संघात आहे.
हेही वाचा :Ravikant Shukla Fraud : बिल्डरची क्रिकेटरला जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल