भोपाळ : अंडर-19 T-20 महिला विश्वचषक जिंकल्यानंतर अंतिम सामन्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या भोपाळच्या सौम्या तिवारीने ईटीव्ही भारतशी खास बातचीत केली आहे. सौम्या तिवारीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ईटीव्ही भारतच्या प्रश्नांना उत्तरे दिली. सौम्याने सांगितले की, अंतिम सामन्यात दडपण होते, पण आम्ही रणनीतीनुसार फलंदाजी आणि गोलंदाजी करून सामना जिंकला. सौम्याने ग्रीन रुमचे दृश्यही दाखवले. येथे सर्व खेळाडू आपल्या कुटुंबातील सदस्यांशी फोनवर बोलत आणि मजा करताना दिसत होते. सौम्या म्हणाली की, विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे ती खूप आनंदी आहे.
सौम्या तिवारीशी ईटीव्ही भारतची खास बातचीत कुटुंबात आनंदाचे वातावरण :भोपाळस्थित क्रिकेटर सौम्या तिवारीच्या घरी विजयानंतर आनंदाची लाट उसळली. अंतिम सामन्यात सौम्याने विजयी शॉट मारला तेव्हा संपूर्ण कुटुंब आनंदाने उभे राहून तिचे अभिनंदन करताना दिसले. सौम्याचे वडील मनीष तिवारी आणि आई भारती यांनी एकमेकांना मिठाई खाऊ घातली. या दरम्यान सौम्याची आई सामना पूर्ण संपेपर्यंत प्रार्थना करत होती. त्यांनी सौम्या आणि टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना केली. आमच्या मुलीने आमचे नाव अभिमानाने उंचावले असल्याचे त्या सांगतात.
मुलीच्या यशाचा अभिमान :सौम्या तिवारीचे वडील मनीष तिवारी यांनाही सौम्याच्या विजयाचा अभिमान वाटत आहे. आपल्या मुलीला मिळालेल्या यशाचा आपल्याला अभिमान असल्याचे तिच्या वडिलांचे म्हणणे आहे. सौम्याची आई भारती सांगतात की, सौम्याच्या या विजयानंतर आता सर्वजण त्यांना सौम्याच्या आई-वडिलांच्या नावाने ओळखतील. ही आई - वडिलांसाठी खूप मोठी गोष्ट आहे.
सौम्या अनेक सामन्यांमध्ये फ्लॉप ठरली :सौम्याचे वडील सांगतात की कोरोनाचा काळ हा त्यांच्यासाठी कठीण काळ होता. त्यावेळी सर्व काही बंद असल्यामुळे सौम्याचा सरावही बंद झाला होता. यामुळे जेव्हा कोरोना उलटल्यानंतर सौम्या मैदानावर गेली तेव्हा ती अनेक सामन्यांमध्ये फ्लॉप ठरली. अशा परिस्थितीत सौम्या या खेळात प्रगती करू शकणार नाही, असे त्यांना वाटले. परंतु सौम्याने हार मानली नाही आणि गेल्या वर्षी तिची राष्ट्रीय संघात निवड झाली. यामध्ये त्यांनी देखील मेहनत घेतली आहे. 17 वर्षांची सौम्या आता भारतीय संघाचा एक अविभाज्य भाग बनली आहे. या नंतर सौम्या अशीच प्रगती करत राहील अशी तिच्या कुटुंबियांची आशा आहे.
हेही वाचा :IND vs NZ 2nd T20 : भारताचा न्यूझीलंडवर ६ गडी राखून विजय; मालिकेत १-१ ने साधली बरोबरी