महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 15 years Complete : आयपीएल स्पर्धेला आज पंधरा वर्ष पूर्ण; पाहा व्हिडिओ - Rajasthan Royals

इंडियन प्रीमियर लीगला आज 15 वर्षे पूर्ण झाली ( IPL 15 years Complete ) आहे. 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता त्याचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या इतिहासातील सर्वात खास क्षण पाहता येतील.

IPL 15
IPL 15

By

Published : Apr 18, 2022, 9:09 PM IST

हैदराबाद:आयपीएल ही जगातील सर्वात मोठी टी-20 क्रिकेट लीग आहे. जगातील प्रत्येक खेळाडूला आयपीएलमध्ये एकदा तरी खेळायचे असते. आयपीएलचा पहिला सीझन आजपासून 15 वर्षांपूर्वी खेळला गेला होता. आयपीएलच्या पहिल्या सत्रात कोलकाता नाईट रायडर्सचा ( Kolkata Knight Riders ) सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore ) विरुद्ध खेळला गेला होता. अशा परिस्थितीत आयपीएलच्या 15 वर्षांनंतर आयपीएलयने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये आयपीएलच्या आतापर्यंत्या महत्त्वाचे क्षण या व्हिडिओमध्ये कैद केले आहेत.

आयपीएलने पंधरा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपल्या अधिकृत साइटवर व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये चाहते आयपीएलच्या इतिहासातील सर्वात खास क्षण पाहू शकतात. ज्यामध्ये मॅक्युलमची 158 धावांची खेळी आणि सचिनचे पहिले आयपीएल शतकही आहे.

आयपीएलचा पहिला सीझन 2008 मध्ये खेळला गेला होता. 18 एप्रिल ते 1 जून या कालावधीत आयपीएल 2008 चे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या आयपीएलमध्ये आठ संघ सहभागी झाले होते. त्यादरम्यान लीगमध्ये 59 सामने खेळले गेले होते.

2008 चा अंतिम सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज ( Rajasthan Royals vs Chennai Super Kings ) यांच्यात नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला गेला होता. अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा तीन गडी राखून पराभव केला. त्यानंतर हा प्रवास सुरूच राहिला आणि दरवर्षी युवा खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळत आहे. त्याचबरोबर या वेळी लीगमध्ये दहा संघ सहभागी होत आहेत. यावेळी गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स यांना पहिल्यांदाच लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.

हेही वाचा -Ipl 2022 Rr Vs Kkr : नाणेफेक जिंकून केकेआरचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; आरआर संघात ट्रेंट बोल्टचे पुनरागमन

ABOUT THE AUTHOR

...view details