महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Women ODI World Cup 2022 : भारतीय महिला संघ उद्यापासू विश्वचषक स्पर्धेत 'या' सात संघाविरुद्ध भिडणार - Women's ODI World Cup Updates

महिला एकदिवसीय विश्वचषक ( Women ODI World Cup ) स्पर्धेला उद्यापासून (गुरुवार) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघ साखळी फेरीत सात संघाविरुद्ध भिडणार आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे.

Indian women
Indian women

By

Published : Mar 2, 2022, 4:23 PM IST

हैदराबाद : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2022 ( ICC Women ODI World Cup 2022 ) स्पर्धेला गुरुवार (4 मार्च) पासून सुरुवात होणार आहे. यंदा भारतीय महिला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारतीय महिला संघाच्या नेतृत्वाची धुरा मिताली राजच्या ( Captain Mithali Raj ) खांद्यावर असणार आहे.

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध ( India v Pakistan ) होणार आहे. हा सामना 6 मार्चला खेळला जाणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ सात सामने खेळणार आहे. साखळी फेरीतील भारताचा शेवटचा सामना दक्षिण आफ्रिके विरुद्ध क्राइस्टचर्च ( India against South Africa ) येथे पार पडणार आहे.

या सात संघासोबत भारतीय संघ करणार दोन हात -

या स्पर्धेत भारतीय महिला संघ ( Indian women team ) सात संघाविरुद्ध दोन हात करताना दिसणार आहे. यामध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्‍ट्रेलिया, बांग्‍लादेश आणि दक्षिण आफ्रिका या सात संघाचा समावेश आहे.

टीम इंडिया कधी आणि कोणासोबत भिडणार?

  • 6 मार्च - भारत विरुद्ध पाकिस्तान - माउंट मौनगानुई
  • 10 मार्च - भारत विरुद्ध न्यूझीलंड - हॅमिल्टन
  • 12 मार्च - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज - हॅमिल्टन
  • 16 मार्च - भारत विरुद्ध इंग्लंड - माउंट मौनगानुई
  • 19 मार्च - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ऑकलंड
  • 22 मार्च - भारत विरुद्ध बांगलादेश - हॅमिल्टन
  • 27 मार्च - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - क्राइस्टचर्च

ABOUT THE AUTHOR

...view details