कोलंबो -लंका प्रीमियर लीगच्या (एलपीएल) पहिल्या सत्रात गॉल ग्लेडिएटर्सचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने जाफना स्टॅलियन्सविरुद्ध २० चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याने आपल्या खेळीत २३ चेंडूंत ३ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या. आफ्रिदीच्या या खेळीनंतरही ग्लेडिएटर्सला विजय नोंदवता आला नाही.
आफ्रिदीच्या टी-२० कारकिर्दीतील हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. तीन वर्षांपूर्वी, त्याने २० चेंडूतच हा कारनामा केला होता. २०१७मध्ये, त्याने हॅम्पशायरकडून टी-२० ब्लास्टमध्ये खेळताना डर्बीशायर विरुद्ध अर्धशतक केले. त्यानंतर त्याने या अर्धशतकाचे शतकात रूपांतर केले आणि त्याच्या टी-२० कारकीर्दीतील हे एकमेव शतक आहे.