इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० स्पर्धा 2021 मधील 45 वा सामना आज दुबईच्या मैदानावर खेळला जाईल. कोलकाता नाईट रायडर्स विरुध्द पंजाब किंग्ज यांच्यात हा सामना होईल. दोन्ही संघासाठी विजय महत्त्वाचा आहे. आजच्या सामन्याला सुरुवात झाली असून टॉस पंजाबने जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
केकेआर संघाने या स्पर्धेत एकूण 11 सामने खेळले असून 5 सामने जिंकून 10 गुण मिळवले आहेत. ‘आयपीएल’च्या पूर्वार्धात त्यांनी अवघ्या दोनच लढती जिंकल्या होत्या.
के. एल. राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जच्या खात्यात ११ सामन्यानंतर आठ गुण आहेत. गेल्या तिन्ही सामन्यांत फलंदाजांचीत हा संघ अपयी ठरला आहे. त्यामुळे आजचा सामना ते कसे खेळतात हे पाहणे रंजक ठरेल.
कोलकाता नाईट रायडर्स संघातील आंद्रे रसेल याला दुखापतीमुळे आज बाहेर थांबावे लागेल. तर पंजाब संघातील ख्रिल गेलने आयपील सोडली असून तो यापुढे उपलब्ध नसणार आहे.