मुंबई:पाच वेळा इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) चॅम्पियन मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians ) आयपीएल 2022 ( IPL 2022 ) च्या उर्वरित सामन्यांसाठी दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज मोहम्मद अर्शद खानच्या जागी फिरकी गोलंदाज कुमार कार्तिकेय सिंगचा समावेश केला ( Kumar Kartikeya Singh replaces Arshad Khan ) आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कुमार कार्तिकेयने 2018 मध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत नऊ प्रथम श्रेणी सामने, 19 लिस्ट ए सामने आणि आठ टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये अनुक्रमे 35, 18 आणि नऊ विकेट्स घेतल्या आहेत.
तो सपोर्ट टीमचा भाग म्हणून आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघासोबत होता आणि आता त्याला मुख्य संघात सामील होण्यासाठी करारबद्ध करण्यात आले आहे. कारण दुखापतीमुळे अर्शद खान उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला आहे.