हैदराबाद:टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली ( BCCI president Sourav Ganguly ) याच्याबाबत नवीन अटकळ बांधली जात आहे. सौरव गांगुली बीसीसीआय अध्यक्षपद सोडू शकतो अशी चर्चा आहे. सौरव गांगुलीच्या एका ट्विटर पोस्टनंतर ही अटकळ बांधली जात आहे. ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की, मी काहीतरी सुरू करण्याचा विचार करत आहे. जे मला वाटते की, कदाचित बऱ्याच लोकांना मदत होईल. मी माझ्या जीवनाच्या या अध्यायात प्रवेश करत असताना तुम्ही मला पाठिंबा देत राहाल अशी आशा आहे.
सौरव गांगुलीच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर त्याच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, याबाबत कुठेही अधिकृत घोषणा झालेली नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी असे ट्विट केले होते, ज्यानंतर त्यांनी आपले पद सोडल्याची चर्चा सुरू झाली होती. बीसीसीआयचे सचिव जय शाह ( BCCI Secretary Jai Shah ) यांनी सांगितले की, गांगुलीने पद सोडलेले नाही.
गांगुलीने ट्विट करताना लिहिले की, मी 1992 मध्ये माझा प्रवास सुरू केला. 2022 हे वर्ष माझ्या क्रिकेट कारकिर्दीला 30 वर्षे पूर्ण करण्याचे वर्ष आहे. तेव्हापासून क्रिकेटने मला खूप काही दिले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला तुम्हा सर्वांचा पाठिंबा मिळाला आहे. माझ्या या प्रवासात सहभागी झालेल्या आणि आज मी जिथे आहे तिथे पोहोचवणाऱ्या प्रत्येक समर्थकाचे मी आभार मानू इच्छितो.
ते म्हणाले, आज मी अशी एक गोष्ट सुरू करण्याचा विचार करत आहे, ज्याचा खूप लोकांना फायदा होईल अशी आशा आहे. माझ्या आयुष्याच्या या नवीन अध्यायात मला तुमची साथ मिळेल अशी आशा आहे.