न्यूझीलंड : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज महिला ( Indian women v West Indies women ) संघात आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाचा सराव सामना पार पडला. हा सामना मंगळवारी खेळला गेला. या सामन्यात भारतीय महिला संघाने स्मृती मंधानाच्या 67 चेंडूत 66 धावांच्या ( Smriti Mandhana played a half century ) खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजचा 81 धावांनी पराभव केला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 50 षटकांत 258 धावा केल्या होत्या. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाला विजयासाठी 259 धावांचे लक्ष्य मिळाले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ निर्धारित 50 षटकांत 9 फलंदाज गमावून केवळ 177 धावा करु शकला. त्यामुळे त्यांना 81 धावांनी भारताकडून पराभव स्वीकारावा ( West Indies lost by 81 runs ) लागला.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने शानदार फलंदाजी केली. ज्यामध्ये स्मृती मंधानाने 66 धावांच्या महत्वपूर्ण योगदान दिले. त्याचबरोबर दीप्ति शर्मा 51, मिताली राज 30 आणि यास्तिका भाटिया 42 ( Yastika Bhatia 42 runs ) यांनी धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर वेस्ट इंडिजकडून गोलंदाजी करताना हेली मॅथ्यूज 2(47) आणि चेरी-एन फ्रेजर 2(24) यांनी शानदार गोलंदाजी करताना सर्वाधिक विकेट्स घेतल्या.