दुबई :सध्या श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर आहे. भारत विरुद्ध श्रीलंका संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका पार पडली आहे. या मालिकेत भारतीय संघाचा युवा खेळाडू श्रेयस अय्यरने ( Young player Shreyas Iyer ) शानदार प्रदर्शन केले होते. त्यामुळे भारतीय संघाने श्रीलंका संघाला टी-20 मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप दिला होता. आता या मालिकेत शानदार प्रदर्शन केल्याचा फायदा श्रेयस अय्यरला आयसीसी टी-20 क्रमवारीत फायदा झाला आहे.
श्रेयस अय्यरला आयसीसी टी-20 क्रमवारीत 27 स्थानांचा फायदा होऊन तो 18 व्या स्थानी ( Shreyas Iyer ranked 18th ) विराजमान झाला आहे. या त्याच्या क्रमवारीवर श्रीलंके विरुद्ध टी-20 मालिकेत केलेल्या कामगिरीचा प्रभाव पडला आहे. 27 वर्षीय फलंदाज श्रेयस अय्यरने फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताच्या 3-0 च्या विजयादरम्यान तीन नाबाद अर्धशतके झळकावली होती. ज्यामध्ये श्रेयसने 174 च्या स्ट्राइक रेटने 204 धावा केल्या. त्याचा सहकारी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने गोलंदाजांच्या क्रमवारीत तीन स्थानांनी झेप घेत 17व्या स्थानावर पोहोचला आहे.