महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Shane Warne passes away : शेन वॉर्नचे निधन हे वैयक्तिक नुकसान आहे, त्याच्यासोबत खेळणे हा माझा सन्मान - राहुल द्रविड - शेन वार्नचे निधन

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या मते, जोपर्यंत क्रिकेट खेळले जाईल, तोपर्यंत हा महान ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वार्न ( Australian spinner Shane Warne ) लक्षात राहील.

Shane Warne
Shane Warne

By

Published : Mar 6, 2022, 12:53 PM IST

मोहाली : भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू आणि भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid coach of the Indian team ) सध्या मोहाली येथे भारतीय संघा सोबत आहे. त्याने शनिवारी शेन वार्न बद्दल बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, जोपर्यंत क्रिकेट खेळले जाईल, तोपर्यंत हा महान ऑस्ट्रेलियन फिरकीपटू लक्षात राहील.

लेग स्पिनच्या कलेला जीवदान देणाऱ्या वॉर्नचे शुक्रवारी वयाच्या 52व्या वर्षी थायलंडमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन ( Shane Warne died ) झाले. त्यामुळे क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे. शेन वार्न आणि राहुल द्रविड या दोघांनी आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( Board of Control for Cricket in India ) ट्विटर हँडलवर जारी केलेल्या व्हिडिओमध्ये द्रविड म्हणाला, "मला शेन वॉर्नविरुद्ध खेळण्याचे सौभाग्य आणि सन्मान मिळाला आहे. विशेष म्हणजे मला त्याला वैयक्तिकरित्या जाणून घेण्याचा, त्याच्यासोबत खेळण्याचा बहुमान देखील मिळाला आहे. माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील हा एक ठळक क्षण असेल."

तो म्हणाला, "हे खरंच वैयक्तिक नुकसानासारखे वाटत आहे. यामुळे खरोखर दुखापत झाली आहे. हे दुःखद आहे. जोपर्यंत खेळ खेळला जाईल, तोपर्यंत शेन वॉर्न आणि रॉडनी मार्शला आठवले जाईल."

ABOUT THE AUTHOR

...view details