मुंबई- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जूनमध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी -२० मालिकेसाठी भारतीय महिला संघांची घोषणा झाली आहे. शुक्रवारी बीसीसीआयने केलेल्या संघाच्या घोषणेमध्ये शफाली वर्माचा भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.
चार दिवसांच्या कसोटी सामन्यात शिखा पांडे आणि तानिया भाटिया या खेळाडूंचीही पुन्हा निवड झाली असली तरीदेखील शफालीच्या निवडीवरुन हे दिसून येते की निवडकर्त्यांचा असा विश्वास वाटतो की ती गेम चेंजर असू शकते.
१६ जूनपासून सुरू होणार्या चार दिवसीय कसोटी सामन्यात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच मैदानात उतरतील. त्यानंतर २७ जूनपासून सुरू होणार्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन्ही संघ ब्रिस्टल, टॉन्टन आणि वॉरेस्टर येथे खेळणार आहेत.
त्यानंतर ९ जुलैपासून दोन्ही संघ टी -२० मध्ये प्रवेश करतील आणि तीन सामने नॉर्थॅम्प्टन, होव आणि चेल्म्सफोर्ड येथे होतील. "