नवी दिल्ली :आयसीसी क्रिकेट विश्वचषक यंदा ऑक्टोबरमध्ये घरच्या मैदानावर होणार आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने जसप्रीत बुमराहच्या विश्वचषकासाठी उपलब्धतेवर शंका व्यक्त केली आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मागील अनेक दिवसांपासून पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. बुमराह सध्या न्यूझीलंडमध्ये पाठीच्या शस्त्रक्रिया करत आहे. वेगवान गोलंदाज पूर्णपणे बरा होण्यासाठी आणि खेळण्यासाठी तसेत तंदुरुस्त होण्यासाठी सुमारे 6 महिने लागतील.
विश्वचषक सुरू होण्याच्याआधी बुमराह परतणार :विश्वचषकापूर्वी बुमराहला तंदुरुस्त राहणे कठीण आहे. भारताचा माजी कर्णधार गांगुली म्हणाला की, तो 6 महिन्यांनंतर मैदानात परतणार आहे. विश्वचषक सुरू होण्याच्याआधी बुमराह परतणार आहे. विश्वचषकाच्या तयारीसाठी तंदुरुस्त राहणे त्याच्यासाठी कठीण जाईल, असे बीसीसीआयचे माजी अध्यक्षांचे मत आहे. शस्त्रक्रियेनंतर तंदुरुस्त होण्यासाठी आणि मैदानावर परतण्यासाठी किती वेळ लागू शकतो, याविषयी गांगुली म्हणाला, 'मैदानावर परतणे अनेक घटकांवर अवलंबून असते. शस्त्रक्रिया कशी झाली? किंवा इतर गोष्टींवर हे अवलंबून आहे.