महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Shane Warne Death Anniversary : शेन वॉर्नच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त सचिनने केली भावनिक पोस्ट, म्हणाला.. - सचिन तेंडुलकर शेन वॉर्न

दिग्गज ऑस्ट्रेलियन गोलंदाज शेन वॉर्नचे त्याचा खास मित्र सचिन तेंडुलकरने त्याच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त स्मरण केले आहे. सचिनने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक भावनिक पोस्ट करत वॉर्नसाठी शोकसंदेश लिहिला आहे.

sachin tendulkar shane warne
सचिन तेंडुलकर शेन वॉर्न

By

Published : Mar 5, 2023, 6:36 AM IST

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्न याची काल पहिली पुण्यतिथी होती. कालच्याच दिवशी 2022 मध्ये थायलंडमध्ये सुट्टीवर असताना एका हॉटेलमध्ये वॉर्नचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. वॉर्नच्या पुण्यतिथीनिमित्त क्रिकेटच्या सर्व दिग्गजांनी त्याचे स्मरण केले. 'फिरकीचा राजा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वॉर्नचे 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकरने त्याच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त हृदयस्पर्शी शब्दात स्मरण केले आहे. सचिन आणि वॉर्न दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते आणि दोघेही वेळोवेळी एकमेकांना भेटत असत.

काय म्हणाला सचिन? : सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर वॉर्नसोबत घालवलेले दिवस आठवले आहेत. त्याने एक छायाचित्र देखील पोस्ट केले ज्यामध्ये हे दोन दिग्गज क्रिकेटपटू एकमेकांशी बोलत आहेत. सचिनने शनिवारी ट्विटरवर लिहिले की, 'आम्ही मैदानात काही संस्मरणीय सामने खेळलो आहेत आणि मैदानाबाहेरही काही संस्मरणीय क्षण घालवले आहेत. मी केवळ एका महान क्रिकेटरलाच नाही तर एका चांगल्या मित्राला मिस करतो आहे. मला खात्री आहे की तुझ्या विनोदबुद्धीने आणि करिष्म्याने तु स्वर्गालाही पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक बनवत असशील'.

सचिन वॉर्नच्या स्वप्नात यायचा : तेंडुलकर आणि वॉर्न एकूण 29 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आमनेसामने आले होते. यापैकी वार्नने सचिनला चार वेळा बाद केले. वॉर्नच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, वॉर्न हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. वॉर्नने 145 कसोटी सामन्यांमध्ये 708 विकेट्स घेतल्या आहेत, तर 194 एकदिवसीय सामन्यांमध्ये 293 विकेट घेतल्या आहेत. या शिवाय त्याने त्याच्या गोलंदाजीने 1999 साली ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. वॉर्नला त्याच्या 'बॉल ऑफ द सेंच्युरी' साठीही स्मरणात ठेवले जाते. 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यावर सचिनने वॉर्नची भरपूर धुलाई केली होती. त्यानंतर शेन वॉर्न म्हणाला होता की, सचिन त्याच्या स्वप्नात येतो आणि तो तिथेही त्याच्या चेंडूंवर षटकार मारतो.

हेही वाचा :Winter Games in Gulmarg : काश्मीर खोऱ्यात लष्कराचे खेळांना प्रोत्साहन, गुलमर्गमध्ये हिवाळी खेळांचे आयोजन केले

ABOUT THE AUTHOR

...view details