दुबई: विराट कोहलीने जवळपास तीन वर्षांनंतर शतक ( Virat Kohli century ) झळकावले. त्याच्या 122 धावांमुळे भारताने आशिया कपच्या औपचारिकतेत अफगाणिस्तानविरुद्ध 101 धावांनी विजय नोंदवला. कोहलीने 61 चेंडूत 12 चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद 122 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारताने 2 बाद 212 धावा केल्या. कोहलीने आपले 71 वे आंतरराष्ट्रीय शतक ( Virat Kohli 71st international century ) झळकावून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगची बरोबरी केली. कोहलीचे हे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक ( Virat Kohli first century in T20I ) आहे. विराट कोहलीने तब्बल तीन वर्षांनंतर (1020 दिवस) शतक केले आहे. या सामन्यानंतर रोहित शर्माने विराट कोहलीची मुलाखत घेतली आहे.
या कामगिरीनंतर रोहितने विराटची मुलाखत घेतली ( Rohit Sharma took Virat Kohli interview ). दोघांमध्ये 6 मिनिटे 55 सेकंद बोलणे झाले. त्यांच्या संभाषणाचा व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) शेअर केला आहे. यादरम्यान दोघेही खूप मजेशीर अंदाजात दिसले. विराटला प्रश्न विचारत असताना रोहित शर्मा पूर्णपणे हिंदीत बोलण्याचा प्रयत्न करत होता आणि कोहलीला त्याचे हसू येत होते. विराट म्हणाला की, माझ्याशी पहिल्यांदा बोलत असताना तो इतके शुद्ध हिंदी बोलत आहेत. यावर रोहितने सांगितले की, त्याची योजना हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषा एकत्र बोलण्याची होती, पण जर त्याला हिंदीमध्ये चांगली लय दिसली तर त्याने या भाषेत बोलण्याचा निर्णय घेतला.