गांधीनगर ( गुजरात ) :भारताचा कर्णधार रोहित शर्माने माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या अतिआत्मविश्वासामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंदूर कसोटी गमावला अशी टिप्पणी मूर्खपणा असल्याचे म्हटले आहे. रवी शास्त्री हे 2014 नंतर 6 वर्षे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. तिसर्या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून भारताचा नऊ गडी राखून झालेल्या पराभवावर भाष्य करताना रोहित शर्मा म्हणाला की, लोक म्हणतात भारतीय संघाचा स्वत:वर थोडा जास्त आत्मविश्वास आणि अतिआत्मविश्वास होता. अशी अनेक गोष्टी अनेकांनी गृहीत धरल्या आहेत, हे साफ चुकीचे आहे.
रोहित शर्माचे जोरदार प्रत्यूत्तर : कर्णधार पदाची धूरा सांभाळल्यानंतर रोहितने गेल्या 18 महिन्यात शांतता, संयम आणि संघाचा सन्मान राखला आहे. परंतु तिसऱ्या कसोटी सामन्याबाबत माजी प्रशिक्षकांचे मत विचारले असता, रोहित शर्माने अतिशय जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला रोहित म्हणाला की, खरे सांगायचे तर, जेव्हा तुम्ही दोन सामने जिंकता तेव्हा बाहेरच्या लोकांना वाटते की आम्ही अतिआत्मविश्वासी आहोत. हा पूर्ण मूर्खपणा आहे. कारण तुम्हाला चारही सामन्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. त्याचे प्रेशर असते.