मुंबई: आयसीसी टी-20 विश्वचषक 2007 दरम्यान भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या रॉबिन उथप्पाने देखील एकदिवसीय सामन्यांच्या सुरुवातीच्या आणि समापन सत्रांच्या महत्त्वावर चर्चा केली. वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेत संजू सॅमसनच्या यष्टिरक्षण क्षमतेचे कौतुक ( Appreciation of Robin Uthappa Sanju Samson ) केले. यजमानांविरुद्धच्या मालिकेत भारताने 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
अलीकडेच विराट कोहली खराब फॉर्ममधून ( Virat Kohli poor form ) जात असल्याने त्याने खेळातून विश्रांती घ्यावी की नाही यावर वाद सुरु आहे. यावर उथप्पा म्हणाला, आपल्याकडे त्याच्या स्थानावर किंवा त्याच्या खेळ जिंकण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा कोणताही अधिकार नाही आणि कोणताही आधार नाही. तो पुढे म्हणाला, “तो (कोहली) सामना विजेता आणि जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक ( kohli one of best players in world ) आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह एक उत्कृष्ट कसोटी कर्णधार असेल, असेही या अनुभवी क्रिकेटपटूने म्हटले आहे.