लंडन : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खास कामगिरी केली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी त्याने एक रेकॉर्ड आपल्या नावे केला. अशी कामगिरी करणारा तो देशातील सर्वोत्तम डावखुरा फिरकी गोलंदाज बनला आहे. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडला बाद करून जडेजा प्रसिद्ध फिरकीपटू बिशनसिंग बेदीच्या पुढे गेला आहे.
बिशनसिंग बेदींचा विक्रम मोडला : रवींद्र जडेजा भारतीय संघाचे दिग्गज खेळाडू बिशनसिंग बेदी यांचा विक्रम मोडीत काढत त्यांच्या पुढे गेला आहे. बिशनसिंग बेदीने यांनी 67 कसोटी सामन्यात 266 विकेट घेतल्या आहेत. तर रवींद्र जडेजाच्या नावावर आता 65 कसोटी सामन्यात 267 विकेट्स आहेत. अशाप्रकराने जडेजा भारताकडून सर्वाधिक कसोटी विकेट घेणारा डावखूरा फिरकीपटू बनला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध 296 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 4 गडी गमावले आहेत.