नवी दिल्ली:चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) माजी कर्णधार रवींद्र जडेजा ( Former CSK captain Ravindra Jadeja ) याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून आयपीएल संघाच्या 2021 आणि 2022 च्या मोहिमेशी संबंधित सर्व पोस्ट काढून टाकल्या आहेत. जडेजा सीएसके संघावर इतका नाराज आहे की, त्याने यावेळी महेंद्रसिंग धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या नाहीत. त्यामुळे अष्टपैलू खेळाडू सीएसकेला राम-राम ठोकू शकतो ( Ravindra jadeja can say goodbye csk ), असा अंदाज वर्तवला जात आहे.
या अगोदर जडेजा आणि सीएसके यांच्यातील वाद ( Dispute between Jadeja and CSK ) संपल्याचे चाहत्यांना वाटत होते. मात्र अष्टपैलू खेळाडूने चेन्नई सुपर किंग्जशी संबंधित सर्व पोस्ट काढून टाकल्या आहेत. आता चाहत्यांनाही जडेजा आणि सीएसके संघ व्यवस्थापन यांच्यातील संबंध बिघडल्याचे जाणवू लागले आहे.
आयपीएलच्या 15 व्या हंगामाच्या दोन दिवस आधी, डाव्या हाताच्या अष्टपैलू खेळाडूला एमएस धोनीच्या जागी चार वेळा चॅम्पियन संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. पण जडेजाच्या नेतृत्वाखाली संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि नंतर दबावामुळे त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. जडेजा आणि सीएसकेने सोशल मीडियावर एकमेकांना आधीच अनफॉलो केले होते. त्यानंतर जडेजाने त्याच्या इंस्टाग्राम बायोमधून चेन्नईचे नाव काढून टाकले ( Jadeja removed CSK name his Instagram ) आणि आता गेल्या दोन वर्षातील सर्व पोस्ट हटवल्या आहेत.