महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Ranji Trophy 2021-22 Final : रणजी स्पर्धेला मिळाला नवा चॅम्पियन; रणजी करंडकवर मध्य प्रदेशने प्रथमच कोरले नाव

रणजी ट्रॉफी 2021-22 चा अंतिम सामना मुंबई आणि मध्य प्रदेश संघ यांच्यात बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. रविवारी, सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी मध्य प्रदेशने मुंबईचा सहा गडी राखून पराभव करत प्रथमच रणजी करंडक विजेतेपद पटकावले आहे.

Ranji Trophy 2021-22 Final
Ranji Trophy 2021-22 Final

By

Published : Jun 26, 2022, 4:12 PM IST

बंगळुरू: रणजी ट्रॉफी 2021-22 चा अंतिम सामना मुंबई आणि मध्य प्रदेश ( Ranji Trophy 2021-22 Final MP vs MUM ) संघ यांच्यात बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. रविवारी, सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी मध्य प्रदेशने आदित्य श्रीवास्तवच्या नेतृत्वाखाली मुंबईचा सहा गडी राखून पराभव करत प्रथमच रणजी करंडक विजेतेपद पटकावले ( Madhya Pradesh won by 6 wickets )आहे. या सामन्यात मध्य प्रदेश संघाकडून यश दुबे, शुभम शर्मा आणि रजत पाटीदार यांनी शतके झळकावली. तसेच मुंबई संघाकडून सर्फराज खानने शतक झळकावले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात 374 धावा ( Mumbai first innings scored 374 Runs ) केल्या. प्रत्युत्तरात मध्य प्रदेशने 536 धावांची (MP first innings scored 536 Runs ) मोठी धावसंख्या उभारली. तसेच मुंबईला चोख प्रत्त्युत्तर देत मध्य प्रदेशच्या संघाने पहिल्याच डावाच्या जोरावर 162 धावांची आघाडी घेतली होती. मुंबईने आपल्या दुसऱ्या डावात 269 धावा केल्या होत्या. ज्यामुळे सामन्याच्या चौथ्या दिवशी मध्य प्रदेश संघाला 108 धावांचे लक्ष्य मिळाले. जे मध्य प्रदेशने चार गडी गमावून साध्य केले आणि प्रथमच रणजी ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

पहिल्या डावात पिछाडीवर पडल्याने मुंबईचा आत्मविश्वास कमकुवत झाल्याचे दिसत होते. दुसऱ्या डावात वेगात खेळण्याच्या प्रयत्नात मुंबईचा संपूर्ण संघ 269 धावांत गारद झाला होता. मध्य प्रदेशच्या कुमार कार्तिकेयने ( Bowler Kumar Karthikeya ) 4 बळी घेत मुंबईचे कंबरडे मोडले. त्यामुळे मध्य प्रदेशला दुसऱ्या डावात विजयासाठी 108 धावांचे माफक लक्ष्य मिळाले होते. मध्य प्रदेशच्या खेळाडूंनी 30व्या षटकातच ते पूर्ण केले. रजत पाटीदारने विजयी फटका मारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, अंतिम सामन्यात मध्य प्रदेशकडून पराभव स्वीकारावा लागल्याने मुंबईच्या 42वे विजेतेपद मिळवण्याच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. कर्णधार पृथ्वी शॉच्या ( Captain Prithvi Shaw ) नेतृत्त्वात खेळलेल्या मुंबईच्या संघाने स्पर्धेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली होती. मात्र, अंतिम सामन्यात त्यांना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही.

हेही वाचा -Practice Match : भारताने घेतली 366 धावांची आघाडी, विराट कोहलीची फॉर्ममध्ये वापसी

ABOUT THE AUTHOR

...view details