मुंबई: रविवारी इंडियन प्रीमियर लीगच्या ( IPL 2022 0 पंधराव्या हंगामातील 37 वा सामना खेळला गेला. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स ( Mumbai Indians vs Lucknow Super Giants ) संघात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला पार पडला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स (LSG) ने मुंबई इंडियन्सवर 36 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलने ( Captain KL Rahul ) नाबाद 103 धावा करत मोसमातील दुसरे शतक झळकावले. मात्र, विजय मिळवून शतक झळकावल्यानंतरही राहुलसाठी वाईट बातमी समोर आली आहे.
खरेतर, या मोसमात दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटच्या ( Slow over rate ) गुन्ह्यात राहुल दोषी आढळला असून त्याला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. राहुलशिवाय संघातील इतर खेळाडूंना 6 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 50 टक्के यापैकी जे कमी असेल तो दंड ठोठावण्यात आला आहे. राहुलसाठी सर्वात मोठी वाईट बातमी म्हणजे चालू हंगामात तो पुन्हा एकदा या गुन्ह्यात दोषी आढळला, तर त्याला 30 लाख रुपयांचा दंड आणि एका सामन्याची बंदी घातली जाईल.