महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

PAK vs AUS : ऑस्ट्रेलियन खेळाडू एगरच्या साथीदाराला पाठवलेल्या ऑनलाइन धमकीवर, पीसीबीने दिली प्रतिक्रिया

बोर्डाने एका निवेदनात म्हटले की, "पीसीबीला त्या सोशल मीडिया पोस्टची माहिती ( Information of threatening post to PCB ) आहे. पीसीबी, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि दोन्ही देशांच्या संयुक्त सरकारी सुरक्षा संस्थांनी त्याची चौकशी केली आहे."

Aston Agar
Aston Agar

By

Published : Mar 1, 2022, 3:36 PM IST

कराची : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( Pakistan Cricket Board ) ने दावा केला आहे की, त्यांच्या देशाच्या दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघातील सदस्य एस्टन एगरच्या साथीदाराला धमकी देण्यात ( Threat to Aston Agar Companion ) आली होती. परंतु बोर्डाच्या तपासानंतर यात 'विश्वसनीयता' आढळली नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ तब्बल 24 वर्षांनंतर कडेकोट बंदोबस्तात पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला आहे.

बोर्डाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले ( The PCB said in a statement ) आहे, "पीसीबीला त्या सोशल मीडिया पोस्टची माहिती आहे. पीसीबी, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि दोन्ही देशांच्या संयुक्त सरकारी सुरक्षा संस्थांनी त्याची चौकशी केली आहे. अशा प्रकारच्या सोशल मीडियावरील घटनानांसाठी व्यापक सुरक्षा योजना अस्तित्वात आहेत, ज्यांना या प्रकरणात धोका मानला जात नाही. यावेळी आणखी कोणतीही प्रतिक्रिया दिली जाणार नाही."

एगरची जोडीदार मॅडलीनला सोशल मीडियावर एक संदेश पाठवण्यात आला होता ( Threat to australian player in pakistan ) , ज्याची माहिती तत्काळ क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि पीसीबीला दिली होती. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, "ऑस्ट्रेलियन संघाच्या सुरक्षा पथकानेही या प्रकरणाचा तपास केला आणि त्याला विश्वासार्ह धोका मानले नाही."

यापूर्वी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये न्यूझीलंडने पाकिस्तानचा दौऱ्यावर आला होता. तेव्हा न्यूझीलंड संघाला सोशल मीडियावर धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या सरकारच्या सल्ल्याने संघ दौरा सोडून मालिका न खेळताच परतला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details