महाराष्ट्र

maharashtra

ENG vs IND 5th Test : पंत आणि जडेजाच्या नावावर राहिला पहिला दिवस; पहिल्या दिवसअखेर भारत 7 बाद 338

By

Published : Jul 2, 2022, 12:03 PM IST

ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी चांगली फलंदाजी करत संघाला सांभाळले. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 222 धावांची मोठी भागीदारी केली. पंतने 89 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. भारतीय यष्टीरक्षक म्हणून कसोटीत सर्वात जलद शतक झळकावणारा तो फलंदाज ठरला. ऋषभ पंतने कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक ( Fifth century of Rishabh Pant Test career ) झळकावले. रवींद्र जडेजा 163 चेंडूत 83 धावांवर खेळत आहे.

Pant and Ravindra
पंत आणि जडेजा

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या 5व्या कसोटीचा ( India vs England 5th Test Match ) पहिला दिवस टीम इंडियाच्या नावावर राहिला. पहिल्या दिवशी टीम इंडियाने 7 गड्यांच्या मोबदल्यात 338 धावा केल्या. यामध्ये ऋषभ पंतने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 146 धावांची शानदार खेळी खेळली. रवींद्र जडेजा 83 धावांवर नाबाद आहे. इंग्लंडविरुद्धच्या बर्मिंगहॅम कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऋषभ पंतने ( Rishabh Pant century )आपल्या कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 200 हून अधिक धावांची भागीदारी केली. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने 3 आणि मॅथ्यू पॉट्सने 2 बळी घेतले.

तत्पुर्वी या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने ( Captain Ben Stokes ) नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लिश गोलंदाजांनी त्याचा निर्णय योग्य ठरवताना सुरुवातील शानदार गोलंदाजी केली. सलामीवीर फलंदाज शुभमन गिल 17 आणि चेतेश्वर पुजारा 13 धावा करून जेम्स अँडरसनचे बळी ठरले. यानंतर 23 वर्षीय युवा वेगवान गोलंदाज मॅथ्यू पॉट्सने हनुमा विहारी आणि विराट कोहलीची विकेट घेत भारतीय संघाला मोठा धक्का दिला. विहारीने 20 आणि कोहलीने 11 धावा केल्या. पाचव्या क्रमांकावर उतरलेल्या श्रेयस अय्यरने 11 चेंडूत 3 चौकार मारून 15 धावा केल्या. मात्र त्यालाही मोठी खेळी साकारता आली नाही. तो अँडरसनचा तिसरा बळी ठरला.

222 धावांची विक्रमी भागीदारी -

98 धावांवर 5 विकेट पडल्यानंतर टीम इंडियाचा लवकरच डाव गुंडाळेल असे वाटत होते. मात्र 24 वर्षीय ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी चांगली फलंदाजी करत संघाला सावरले. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 222 धावांची विक्रमी भागीदारी ( Rishabh Pant and Ravindra Jadeja Partnership ) केली. आजपर्यंतची कसोटी क्रिकेटमध्ये भारताची सहाव्या विकेट्साटी इंग्लंडविरुद्ध सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. पंतने 89 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. भारतीय यष्टीरक्षक म्हणून कसोटीत सर्वात जलद शतक झळकावणारा तो फलंदाज ठरला. 111 चेंडूत 146 धावा करून पंत ऑफस्पिनर जो रूटचा बळी ठरला. त्याने 19 चौकार आणि 4 षटकार मारले. म्हणजेच त्याने केवळ चौकारावरून 100 धावा केल्या.

मात्र, शार्दुल ठाकूरला मोठी खेळी खेळता आली नाही. तो 12 चेंडूत एक धाव काढून बेन स्टोक्सचा बळी ठरला. रवींद्र जडेजा 163 चेंडूत 83 धावा ( Ravindra Jadeja 83 runs ) खेळत आहे. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार मारले. त्याच वेळी, मोहम्मद शमी देखील 11 चेंडूत 0 धावा करून खेळत आहे. टीम इंडियाने आतापर्यंत 4.63च्या रनरेटने धावा केल्या आहेत. यावरून संघाने किती आक्रमक फलंदाजी केली आहे, हे दिसून येते. टीम इंडिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. अशा स्थितीत त्यांना मालिका जिंकण्यासाठी फक्त अनिर्णित राहण्याची गरज आहे. जसप्रीत बुमराह प्रथमच टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे.

हेही वाचा -Mumbai High Court : कर्मचाऱ्यांना ईएसआय विमा कायद्यातंर्गत लाभ द्या; उच्च न्यायालयाचे बीसीसीआयला आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details