कराची -पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हक आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांनी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेआधी पाकिस्तान बोर्डाला मोठा धक्का दिला आहे. त्यांनी आपापल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पीसीबीने या वृत्ताला दुजारो दिला आहे. माजी खेळाडू सकलेन मुस्ताक आणि अब्दुल रज्जाक यांना पाकिस्तान संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले आहे.
मिसबाह उल हक याने सांगितलं की, कुटुंबीयांपासून दूर राहत मला बायो-बबलमध्ये खूप काळ घालववा लागणार आहे. परंतु मी कुटुंबीयासोबत राहू इच्छित आहे. यामुळे मी प्रशिक्षक पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
दुसरीकडे वकार युनूस याने सांगितलं की, जेव्हा मला मिसबाह उल हक याने त्याचा निर्णय आणि पुढील भविष्यातील योजनाबद्दल सांगितलं, तेव्हा राजीनामा देण्याचा माझा निर्णय सोपा झाला. कारण आम्ही दोघांनी एकत्रित काम केले आहे. आता आम्ही एकत्रितच या पदावरून बाजूला होत आहोत.