कराची: पाकिस्तानी क्रिकेट संघासाठी ( Pakistani Cricket Team ) गुरुवारचा दिवस चांगलाच ठरला. पाकिस्तानने येथे झालेल्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ( PAK vs ENG 2nd T20 ) इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव ( Pakistan defeated England by 10 wickets ) केला. सलामीवीर बाबर आझमने शतक ( Babar Azam Century ) झळकावून फॉर्ममध्ये परतल्याचे दाखवून दिले, तर मोहम्मद रिझवानने ( Mohammed Rizwan ) नाबाद 88 धावांची शानदार खेळी केली. बाबरने 66 चेंडूत नाबाद 110 धावा केल्या. ज्यामुळे पाकिस्तानने तीन चेंडू शिल्लक असताना बिनबाद 203 धावा केल्या आणि विजयाची नोंद केली.
सात सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानची 1-1 ने बरोबरी -
या विजयामुळे पाकिस्तान सात सामन्यांच्या मालिकेत ( PAK vs ENG T20 Series ) सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये मोईन अलीच्या 23 चेंडूत नाबाद 55 धावांच्या ( Moeen Ali half century ) जोरावर अखेरच्या षटकात पाच बाद 199 धावा केल्या. प्रत्युत्तरात बाबर आणि रिझवान यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पध्दतीने खेळत इंग्लंडच्या गोलंदाजांना एकही संधी दिली नाही. बाबरने गेल्या सात टी-20 सामन्यांमध्ये केवळ 98 धावा केल्या होत्या, मात्र या सामन्यात त्याने कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावून वेग पकडला.