मुंबई - दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिल्लीचा वेगवान गोलंदाज एनरिक नार्टिजे याचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून तो दिल्ली संघासोबत जोडला गेला आहे. याची माहिती आज दिल्ली कॅपिटल्सने दिली.
फ्रेंचायझीने सांगितलं की, एनरिक नॉर्टिजे क्वारंटाइनमधून बाहेर आला आहे. चूकीने त्याचाएक कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याची तीन वेळा कोरोना चाचणी करण्यात आली. या तिनही चाचणी निगेटिव्ह आल्या आहेत. आता तो बायो बबलमध्ये सहभागी झाला आहे.
संघासोबत जोडला गेल्यानंतर नार्टिजे यांनी सांगितलं की, मी पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे. क्वारंटाईनमधून बाहेर पडल्यानंतर मला आनंद होत आहे. मी सराव सत्रासह स्टेडियममध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहे.
कगिसो रबाडा आणि नार्टिजे हे दोघे ७ एप्रिल रोजी भारतात दाखल झाले होते. त्यांना बीसीसीआयच्या कोविड १९ च्या प्रोटोकॉलनुसार ७ दिवस क्वारंटाइन करण्यात आले होते. १३ एप्रिल रोजी संघात सामील होण्याआधी नार्टिजे याची कोरोना चाचणी करण्यात आली. यात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. रबाडाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तो संघासोबत जोडला गेला होता.
दरम्यान, नार्टिजे दिल्ली कॅपिटल्सचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. त्याने दिल्लीकडून खेळताना ५० हून अधिक गडी बाद केले आहेत. दिल्लीचा संघ पुढील सामन्यात टॉम कुरेनच्या जागेवर नार्टिजे याला संघात स्थान देऊ शकतो.
हेही वाचा -BCCI वार्षिक करार: विराट, रोहित आणि बुमराह मालामाल; जाणून घ्या सर्व खेळांडूचा पगार
हेही वाचा -IPL 2021 :CSK vs PBKS : दोन्ही किंग्जमध्ये चेन्नईच 'सुपर', पंजाबवर ६ विकेट्सनी मात