महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

आता इंग्लंडची खैर नाही, ६ महिन्यानंतर ख्रिस गेलची संघात 'एन्ट्री' - संघ

गेल शिवाय २३ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरन याला संधी देण्यात आली. तो यापूर्वी विंडीजच्या टी-२० संघातही खेळला आहे. त्याने ८ टी-२० सामन्यांमध्ये १४८ धावा केल्या आहेत. त्यात नाबाद ५३ ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे.

६ महिन्यानंतर ख्रिस गेलची संघात 'एन्ट्री'

By

Published : Feb 8, 2019, 12:00 PM IST

Updated : Feb 8, 2019, 11:45 PM IST

मुंबई - जगातील सर्वाधिक विस्फोटक फलंदाजांपैकी एक असलेल्या ख्रिस गेलचे विंडीजच्या संघात पुनरागमन झाले आहे. इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या पहिल्या २ एकदिवसीय सामन्यांसाठी विंडीजच्या संघाची घोषणा झाली आहे. यात ख्रिस गेलचा समावेश करण्यात आला आहे. त्याचसोबत डाव्या हाताने फलंदाजी करणारा निकोलस पूरन याचीही राष्ट्रीय संघात निवड झाली. दोन्ही संघात पहिला एकदिवसीय सामना २० फेब्रुवारीला होणार आहे.

आक्रमक फलंदाज ख्रिस गेल मागील वर्षीच्या जुलैपासून संघातून बाहेर आहे. अखेर ६ महिन्यानंतर त्याचे संघात पुनरागमन झाले आहे. ३९ वर्षीय गेलला इंग्लंडमध्ये होणारा विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून त्याची निवड करण्यात आली आहे. गेल विंडीजकडून सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणार दूसरा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत २८४ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याने ९ हजार ७२७ धावा केल्या.

गेल शिवाय २३ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरन याला संधी देण्यात आली. तो यापूर्वी विंडीजच्या टी-२० संघातही खेळला आहे. त्याने ८ टी-२० सामन्यांमध्ये १४८ धावा केल्या आहेत. त्यात नाबाद ५३ ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे. विंडीजने इंग्लंडला पहिल्या २ कसोटी सामन्यात पराभूत केले आहे. आता ख्रिस गेलच्या पुनरागमनाने विंडीजचा संघ अधिक मजबूत दिसत आहे.

विंडीजचा एकदिवसीय संघ -
फॅबियन एलेन, देवेंद्र बिशू, डेरेन ब्रावो, ख्रिस गेल, शिमरान हेटमायर, जेसन होल्डर(कर्णधार), शाई होप, इवान लुइस, एशले नर्स, कीमो पॉल, निकोलस पूरन, रॉवमॅन पॉवेल, कीमार रोच, ओशेन थॉमस

Last Updated : Feb 8, 2019, 11:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details