मुंबई :महेंद्रसिंग धोनीच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर सोशल मीडियावर एक खास फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये माजी भारतीय क्रिकेटर मोहम्मद कैफ एमएस धोनीसोबत दिसत आहे. धोनी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात शस्त्रक्रिया करून घरी परतत होता. त्याचवेळी मोहम्मद कैफने त्याची विमानतळावर भेट घेतली आणि त्याच्यासोबत काही फोटो काढले. यानंतर मोहम्मद कैफने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये धोनी पत्नी साक्षी मलिक धोनी आणि मुलगी झिवासोबत दिसत आहे. विमानतळावर मोहम्मद कैफच्या कुटुंबीयांनी धोनीच्या कुटुंबियांसोबत फोटो काढले. मोहम्मद कैफ पोस्ट केलेला हा फोटो सध्याला फार सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. यातील एक फोटो खूपच खास आहे.
मोहम्मद कैफचे धोनीसोबत फोटो सोशल मीडियावर ट्रेंड :मोहम्मद कैफचा मुलगा कबीरसोबतचा धोनीबरोबर असलेला फोटो लोकांना फार आवडला आहे. फोटो शेअर केल्यानंतर मोहम्मद कैफने एक मोहक कॅप्शनही लिहिले आहे की, 'आम्ही आज विमानतळावर महान व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबीय भेटलो. शस्त्रक्रिया करून ते घरी परतत होते. मुलगा कबीर खूप आनंदी आहे कारण धोनीने त्याला सांगितले की तोही त्याच्यासारखाच लहानपणी फुटबॉल खेळत होता. लवकर बरे व्हा, भेटू पुढच्या चॅम्पियशिपच्या वेळी. असे त्याने पोस्टमध्ये लिहले आहे. धोनीचा आणि त्याच्या कुटुंबासोबतचा हा फोटो त्यांच्या चाहत्यांना फार पसंतीला पडला आहे. हा फोटो त्यावेळचा आहे जेव्हा धोनी गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून घरी परतत होता. मोहम्मद कैफ आपल्या कुटुंबासह धोनीला विमानतळावर भेटण्यासाठी गेल होते.