हैदराबाद -चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्याविरोधात शनिवारी पहिला सामना पार पडणार आहे. त्यातच आता मोठी घडामोड घडली आहे. भारताचा प्रसिद्ध खेळाडू महेंद्र सिंह धोनीने चेन्नईच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे. अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाकडे कर्णधार पदाची धुरा देण्यात आली ( MS Dhoni Hands Over Captaincy Ravindra Jadeja ) आहे. याबाबत चेन्नई सुपर किंग्जने सोशल मिडियाच्या माध्यमातून अधिकृत घोषणा केली आहे.
चेन्नईने रविंद्र जडेजा आणि महेंद्र सिंह धोनीवर बोली लावत रिटेन केले होते. जडेजाला 16 कोटी रुपये मोजले होते. तर, धोनीसाठी 12 कोटी रुपये मोजत रिटेन केले होते. जडेजा हा गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात टीमसाठी योगदान देतो. तसेच, सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही तो फॉर्म मध्ये आहे. त्यामुळे सुरुवातीपासून अंदाज बांधण्यात येत होता की, जडेजाची कर्णधार पदी नियुक्ती केली जाणार होती.