महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

MI v KKR : रोहित शर्मा केकेआरविरुद्धच्या सामन्यात खेळणार का? जाणून घ्या - Kolkata Knight Riders

आम्ही जुन्या रेकॉर्डवर विश्वास ठेवत नाही. कारण टी-20 क्रिकेटमध्ये याविषयी जास्त फरक पडत नाही. फक्त त्या दिवशी कोणता संघ चांगला खेळ करतो यावर विजेता ठरलो. क्रिकेट असा खेळ आहे ज्यामध्ये सामन्याच्या दिवशी तुम्हाला सर्वोत्कृष्ट योगदान द्यावे लागते, असे रोहित शर्माने केकेआरविरुद्धच्या सामन्याआधी म्हटलं आहे.

mi-vs-kkr-mumbai-indian-captain-rohit-sharma-told-before-the-match-against-kkr-why-it-will-not-be-easy-to-beat-this-team
MI v KKR : रोहित शर्मा केकेआरविरुद्धच्या सामन्यात खेळणार का? जाणून घ्या

By

Published : Sep 23, 2021, 5:44 PM IST

अबुधाबी - आयपीएल 2021 मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. दुसऱ्या सत्रातील पहिल्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा खेळला नव्हता. यामुळे आजचा देखील सामना तो खेळणार की नाही याविषयी चर्चा रंगली आहे. पण रोहित शर्माने दिलेली प्रतिक्रिया पाहून तो जवळपास खेळणार असल्याचे निश्चित होत आहे.

कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्याआधी बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, आम्ही जुन्या रेकॉर्डवर विश्वास ठेवत नाही. कारण टी-20 क्रिकेटमध्ये याविषयीचा जास्त फरक पडत नाही. फक्त त्या दिवशी कोणता संघ चांगला खेळ करतो यावर विजेता ठरलो. क्रिकेट असा खेळ आहे ज्यामध्ये सामन्याच्या दिवशी तुम्हाला सर्वोत्कृष्ट योगदान द्यावे लागले.

कोलकाता नाइट रायडर्सचा संघ चांगला संघ आहे. त्यांनी मागील सामन्यात चांगली कामगिरी करत विजय मिळवला होता. आरसीबीविरुद्ध विजय मिळवल्यानंतर ते आत्मविश्वासाने आमच्याविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरतील. यामुळे केकेआरविरुद्धचा सामना सोपा नाही. आम्हाला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील, असे देखील रोहित शर्मा म्हणाला.

केकेआर विरुद्ध आमचा रेकॉर्ड चांगला आहे. तरीदेखील आम्ही चांगला खेळ केला तरच आम्हाला विजय मिळेल, असेही रोहित शर्मा म्हणाला. दरम्यान, आयपीएलमध्ये मुंबईने केकेआरला 22 सामन्यात पराभूत केले आहे. तर केकेआरला फक्त 6 सामन्यात मुंबईला नमवता आलं आहे.

हेही वाचा -IPL 2021 : श्रेयस अय्यर टी-20 क्रिकेटमध्ये 4 हजारी मनसबदार

हेही वाचा -IPL 2021: केकेआरसमोर आज गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे आव्हान

ABOUT THE AUTHOR

...view details