लंडनभारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या All-rounder Krunal Pandya मांडीच्या स्नायूंना दुखापत झाल्यामुळे रॉयल लंडन वनडे चषक Royal London ODI Cup स्पर्धेत इंग्लिश कौंटी वॉरविकशायरकडून English county of Warwickshire खेळू शकणार नाही. हा 31 वर्षीय भारतीय खेळाडू 17 ऑगस्ट रोजी नॉटिंगहॅमशायरविरुद्ध वॉर्विकशायरकडून फलंदाजी करताना जखमी झाला होता.
यानंतर क्रुणाल मैदानात उतरला नाही. मिडलसेक्स आणि डरहमविरुद्धच्या पुढील दोन सामन्यांमध्येही तो संघाचा भाग नव्हता. नॉटिंगहॅमशायरविरुद्धच्या रॉयल लंडन चषक Royal London ODI Cup सामन्यादरम्यान क्रुणाल पांड्याला दुखापत झाली होती आणि आज संध्याकाळी तो भारतात परतेल, असे क्लबने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. क्रुणालला या काऊंटी क्लबने जुलैमध्ये 50 षटकांच्या स्पर्धेसाठी त्यांच्या संघात घेतले होते.