लंडन : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ( Fast bowler Jaspreet Bumrah ) 'द केनिंग्टन ओव्हल' येथे खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 7.2 षटकात 19 धावांत 6 गडी बाद केले. त्याने सर्वोत्तम गोलंदाजी करताना अनेक विक्रम मोडीत काढले, त्यात फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचा इंग्लंडविरुद्ध 6/25 धावांचा विक्रम ( Jaspreet Bumraha broke Kuldeep record ) होता.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान गोलंदाज बुमराहने इंग्लंडच्या फलंदाजांवर भारी पडला. त्याने इंग्लंडच्या फलंदाजीला सुरुंग लावत सहा विकेट घेतल्या. यादरम्यान इंग्लंडचा संघ 25.2 षटकांत गारद झाला आणि 110 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच वेळी, बुमराह इंग्लंडमध्ये वनडेमध्ये सहा विकेट घेणारा ( Bumrah take six wickets in ODI ) पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला.