महाराष्ट्र

maharashtra

WI vs SA: होल्डर पकडला जबरदस्त झेल; फलंदाज, गोलंदाज सगळेच हैराण, पाहा व्हिडिओ

By

Published : Jun 21, 2021, 5:48 PM IST

होल्डरने टिपलेला झेल कठीण होता. त्याने दुसऱ्या स्लीपकडे गेलेला चेंडू सूर मारत टिपला. यातून त्याच्या फिटनेसची झलक पाहायला मिळाली. झेल टिपल्यानंतर होल्डरच्या आनंदाला पारा उरला नाही. तो चेंडू घेऊन मैदानात पळाला. त्याच्या मागे इतर खेळाडू पळताना पाहायला मिळाले. वेस्ट इंडिज बोर्डाने देखील होल्डरचे कौतूक केले.

jason holder Takes a One-Handed Stunning Catch to dismiss keshav maharaj in 2nd- test match wi vs sa
jason holder Takes a One-Handed Stunning Catch to dismiss keshav maharaj in 2nd- test match wi vs sa

मुंबई - सेंट लुसिया येथे वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरने या सामन्यात एक प्रेक्षणीय झेल टिपला. सोशल मीडियावर होल्डरच्या झेलचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतं आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात होल्डरने आफ्रिकेचा फलंदाज केशव महाराज याचा दुसऱ्या स्लीपमध्ये हवेत सूर घेत झेल टिपला. आफ्रिकेच्या डावातील २६ व्या षटकात जायडन सिल्सने महाराजला फुल्ल लेंथ चेंडू फेकला. तेव्हा महाराजने तो चेंडू टोलावत धावा घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याला नशिबाची साथ लाभली नाही. स्लीपमध्ये उभा असलेल्या होल्डरने तो झेल टिपला.

होल्डरने टिपलेला झेल कठीण होता. त्याने दुसऱ्या स्लीपकडे गेलेला चेंडू सूर मारत टिपला. यातून त्याच्या फिटनेसची झलक पाहायला मिळाली. झेल टिपल्यानंतर होल्डरच्या आनंदाला पारा उरला नाही. तो चेंडू घेऊन मैदानात पळाला. त्याच्या मागे इतर खेळाडू पळताना पाहायला मिळाले. वेस्ट इंडिज बोर्डाने देखील होल्डरचे कौतूक केले.

दरम्यान, दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजला ३०९ धावांची गरज आहे. वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात बिनबाद १५ धाा केल्या आहेत. आता पर्यंत तीन दिवसांचा खेळ झाला आहे. आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात १७४ धावांत आटोपला. तर वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात १४९ धावांत ऑलआउट झाला होता.

हेही वाचा -'...म्हणून IPL मध्ये जेमिसनने विराटला गोलंदाजी करण्यास दिला होता नकार'

हेही वाचा -WTC Final : चौथ्या दिवसांचा खेळ होणार की नाही, दिनेश कार्तिकने दिले अपडेट

ABOUT THE AUTHOR

...view details