मुंबई:इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या समाप्तीकडे वाटचाल करत असताना काही खेळाडू जखमी झाल्याने चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या चिंतेत वाढ झाली आहे. सोमवारी अंबाती रायडूने सोमवारी पंजाब किंग्जविरुद्ध दुखापतग्रस्त हाताने शानदार खेळी खेळली. तसेच सराव सत्रादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे मोईन अलीही सामन्यातून बाहेर पडला आहे. यावर आता चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग ( CSK coach Stephen Fleming ) यांनी प्रतिक्रिया दिली.
खेळाडूंच्या दुखापतींमुळे सीएसकेला यंदाच्या मोसमात त्रास होत आहे. कारण वेगवान गोलंदाज दीपक चहरला बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन करताना पाठीच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडावे लागले. तर अॅडम मिल्नेही या समस्येमुळे लीगमधून बाहेर पडला असून, त्यामुळे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
सीएसकेने ( CSK ) आयपीएल 2022 ( IPL 2022 ) मध्ये फक्त दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे 10 संघांच्या स्पर्धेत ते गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहेत. यामुळे भारतीय क्रिकेटमधील सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक महेंद्रसिंग धोनीची जागा घेणारा नवा कर्णधार रवींद्र जडेजाच्या अडचणीत भर पडली आहे. तथापि, फ्लेमिंगने रायडूच्या 39 चेंडूत 78 धावा केल्याबद्दल त्याचे कौतुक केले. कारण त्याने पंजाबच्या 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु 11 धावांनी पराभव पत्करावा लागला.