महाराष्ट्र

maharashtra

Irani Cup : शेष भारत संघाच्या कर्णधारपदी हनुमा विहारीची वर्णी, पाहा संपूर्ण संघ

By

Published : Sep 28, 2022, 7:19 PM IST

बीसीसीआय सचिव जय शाह ( BCCI Secretary Jai Shah ) यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, संघात विहारी, मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाल, अभिमन्यू ईश्वरन, यश धुल, सरफराज खान, यशस्वी जैस्वाल यांच्या रूपात अनुभवी आणि युवा फलंदाजांचे चांगले मिश्रण आहे.

Hanuma Vihari
हनुमा विहारी

नवी दिल्ली:अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने ( All India Senior Selection Committee ) बुधवारी इराणी चषक 2022 ( Irani Cup 2022 ) मधील सौराष्ट्र विरुद्धच्या सामन्यासाठी भारताच्या 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. त्याचबरोबर या संघाचे नेतृत्व भारताचा कसोटी फलंदाज हनुमा विहारीकडे ( Captain Hanuma Vihari ) सोपवले आहे.

रणजी ट्रॉफी 2019-20 चॅम्पियन सौराष्ट्र विरुद्धचा हा सामना 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर ( Saurashtra Cricket Association Stadium ) खेळवला जाईल. 2019-20 मध्ये सौराष्ट्र रणजी चॅम्पियन बनल्यानंतर, कोविड-19 मुळे लॉकडाऊनमुळे हा सामना खेळता आला नाही. तीन वर्षांनंतर ही स्पर्धा पुन्हा सुरु होत आहे, जी साथीच्या रोगामुळे रद्द करण्यात आली होती.

बीसीसीआय सचिव जय शाह ( BCCI Secretary Jay Shah ) यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, संघात मयंक अग्रवाल ( Mayank Agarwal ), प्रियांक पांचाल, अभिमन्यू ईश्वरन, यश धुल, सरफराज खान, यशस्वी जैस्वाल आणि विहारी व्यतिरिक्त अनुभवी आणि युवा फलंदाजांचे चांगले मिश्रण आहे. यातील सरफराज खान आणि यशस्वी जैस्वाल अप्रतिम फॉर्मात आहेत. यशस्वीने दुलीप ट्रॉफी 2022 च्या अंतिम सामन्यात आपल्या संघासाठी द्विशतक झळकावले होते. त्याचबरोबर सरफराज खानने दुसऱ्या डावात नाबाद शतक झळकावले होते. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पश्चिम विभागाने दक्षिण विभागाचा पराभव करत दुलीप करंडक पटकावला.

केएस भरत ( KS Bharat ) आणि उपेंद्र यादव यांचा यष्टीरक्षक म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. फिरकी विभागात जयंत यादव, सौरभ कुमार आणि आर साई किशोर यांच्यावर लक्ष असेल, तर वेगवान गोलंदाज म्हणून मुकेश कुमार, उमरान मलिक, कुलदीप सेन आणि अर्जन नागवासवाल यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

शेष भारत संघ :

हनुमा विहारी (कर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, अभिमन्यू ईश्वरन, यश धुल, सरफराज खान, यशस्वी जैस्वाल, केएस भरत, उपेंद्र यादव, जयंत यादव, सौरभ कुमार, आर साई किशोर, मुकेश कुमार, उमरान मलिक, कुलदीप सेन, उम्रान मलिक आणि अर्जन नागवासवाला.

हेही वाचा -IND A vs NZ A ODI Series : संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली भारत 'अ'चा न्यूझीलंड 'अ' संघाला व्हाईट वॉश

ABOUT THE AUTHOR

...view details