हैदराबाद : आज रविवार असल्याने डबल हेडर-डे आहे. आजचा दुसरा सामना हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात खेळला. हा सामना राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडीयम, हैदराबादला खेळवण्यात आला होता. यात बैदराबादने विजय मिळवला आहे.
हैदराबादची भेदक गोलंदाजी -हैदराबादच्या गोलंदाजांसमोर पंजाबची फलंदाजी पत्त्यांसारखी ढासळली. एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. प्रभसिमरन याला तर खातेही उघडता आले नाही. भुवनेश्वर कुमारने त्याला आऊट केले. सॅम करन याने 15 चेंडूत 22 धावा काढल्या आहेत. त्यामुळे हैदराबादच्या गोलंदाजांनी आज चांगली कामगिरी केली आहे. एकीकडे विकेट पडत असताना शिखर धवनने संयमी फलंदाजी केली.
धवनची स्फोटक खेळी - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स या सामन्यात हैदराबाद संघाच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. ज्यामुळे पंजाब किंग्ज संघाला २० षटकात १४३ धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबसाठी संघाचा कर्णधार शिखर धवनने ६६ चेंडूत सर्वाधिक ९९ धावांची खेळी केली, तर हैदराबादकडून मयंक मार्कंडेने चेंडूसह ४ बळी घेतले.